esakal | अलिबाग : मिनीडोअर चालक मंत्र्यांना अडवणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अलिबाग : मिनीडोअर चालक मंत्र्यांना अडवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मिनीडोअर चालक व मालकांकडून कराच्या स्वरूपात प्रादेशिक परिवहन विभागाने लूट सुरू केली आहे. सरकारने वेगवेगळ्या जाचक अटीही लादल्या आहेत. या अन्यायाविरोधात मिनीडोअर चालक व मालकांनी आक्रमक भूमिका घेतली असून तीन दिवसांपासून वाहनांना काळे झेंडे लावून ते सरकारचा निषेध करत आहेत. १५ दिवसांत ठोस निर्णय झाला नाही, तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला असल्याने वातावरण तापल आहे.

हेही वाचा: ‘रायगड पॅटर्न’मुळे जिल्ह्यात राजकीय वाद विकोपाला

जिल्ह्यातील मिनीडोअर चालकांवर मोठमोठ्या शहरांप्रमाणे जाचक अटी लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असा आरोप चालक-मालक संघटनांचा आहे. अलिबाग पेण, उरण, कर्जत, खालापूर, पनवेल या तालुक्यांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे २५ वर्षांऐवजी २० वर्षे मिनीडोअरची वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.

loading image
go to top