भागवतांकडून स्वयंसेवकांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

अलिबाग - छत्रपती शिवाजी महाराजांची 338 वी पुण्यतिथी किल्ले रायगडावर साजरी केली जाणार आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत शुक्रवारी अलिबाग येथे दाखल झाले. त्यांनी अलिबाग येथे संघाच्या निवडक स्वयंसेवकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

सकाळी झेडप्लस सुरक्षेत भागवत अलिबागमध्ये दाखल झाले. कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांच्या खासगी भेटीसाठी ते अलिबागमध्ये आले होते. घेरिया येथील आंग्रेच्या निवासस्थानी भागवंतांनी संघ कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

Web Title: alibag mumbai news mohan bhagwat Volunteer guidance