रायगडावर सापडल्या शिवकालीन वस्तू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

अलिबाग - रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुण्यातील डेक्कन विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राध्यापक वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात प्राचीन वस्तूंचे मोठे भांडार सापडले आहे. यावरून समकालीन इतिहास उलघडण्यास मदत होईल, असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला.

रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू असून, गडावरील काही भागांत पुरातत्त्व विभागाकडून उत्खननासाठी परवानगी मिळाली आहे. त्यात या वस्तू सापडल्या.

यात शस्त्रांचे अवशेष, शिवकालीन नाणी, बंदुकीतील गोळी, तोफांचे अवशेष, नक्षीदार मातीची मडकी, भांडी, विटा, दळणाची जाती, कौले आदी वस्तूंचा सामावेश आहे.

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे भोसले हे पाहणी करण्यासाठी आले होते. उत्खनन सुरू केल्यानंतर आठ दिवसांत हे अवशेष सापडले आहेत. उत्खनन पूर्ण झाल्यावर हा ऐतहासिक वस्तूंचा खजिना इतिहासप्रेमींसाठी संग्रहालयात जतन केला जाणार आहे. उत्खननासाठी काही मोजकी ठिकाणे निवडण्यात आली असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधींसह अन्य स्थळांचाही समावेश आहे.

Web Title: alibag news historical good receive on raigad