महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


अलिबाग ः महाड येथील तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळून जवळपास 70 ते 80  लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यासाठी शासनातर्फे जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्य राबवण्यात येईल, असे  आश्वसन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

बचावकार्य तत्काळ सुरु करण्यासाठी 25 कामगार, गॅसकटर 1, गनसेट 1, मलबा उचलण्यासाठी दोन जेसीबी, दोन डंपर, तीन रुग्णवाहीका  माणगाव येथून घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली आहे. घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा करत घटनेचा आढावा घेतला. तारिक गार्डन नावाची ही इमारत पाच वर्षांपूर्वी युनुस शेख व पटेल या ठेकेदारांनी बांधलेली होती. यात 40 कुटूंब रहात होते. इमारत कोसळत असताना त्यातील 25 कुटुंब बाहेर पडले; पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.  मदत कार्यासाठी तज्ज्ञांची गरज असून स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनात आल्याने काही कुटुंब बाहेर पडले होते.

दरम्यान, बिल्डर कोहिनुर डेव्हलपर्स, पनवेल यांच्या यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हासरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी केली आहे. नगरपालिकेने या इमारतीला कम्प्लीशन सर्टीफीकेट दिलेच कसे? या विरोधात २०११ ला महामुणकर यांनी सदर इमारतीचे स्ट्रकचर ऑडीट करावे अशी मागणी केली होती. सदर इमारत ही निकृष्ट बांधाकामुळेच कोसळल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्ष स्नेहल जगताप हजर झाले आहेत.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com