ऑर्डर ! ऑर्डर ! 1 डिसेंबरपासून राज्यभरातील सर्व न्यायालये दोन शिफ्टमध्ये सुरू करा, पुणे अपवाद

ऑर्डर ! ऑर्डर ! 1 डिसेंबरपासून राज्यभरातील सर्व न्यायालये दोन शिफ्टमध्ये सुरू करा, पुणे अपवाद

मुंबई, ता. 27 : सुमारे नऊ महिन्याच्या कालावधीनंतर येत्या 1 डिसेंबरपासून पुणे व्यतिरिक्त राज्यभरातील सर्व जिल्हा व अन्य न्यायालये कोविड 19 संबंधित सुरक्षातत्वांचे पालन करुन दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. यामुळे न्यायालयांंच्या प्रत्यक्ष कामाला आता रितसर प्रारंभ होणार आहे.

न्यायालयात हजेरी लावताना चेहऱ्यावर मास्क बंधनकारक आहे. तसेच न्यायालयामध्ये सॅनिटायझर व अन्य निर्धारित सुरक्षा साधने उपलब्ध असावी, ज्यांची सुनावणी असेल त्यांनाच प्रवेश द्यावा, एकमेकांपासून अंतर राखावे, बार रुम स्वच्छ ठेवावे आदी सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. मुख्य न्या. दिपांकर दत्ता यांच्यासह अन्य न्यायमुर्तींनी प्रशासकीय कामकाजावर आज निर्देश जारी केले.

न्यायालयातील कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची सूचना आहे. न्यायाधीशांनी याबाबत दक्ष राहण्याचे आणि वकील संघटनांनी सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामध्ये कसूर करण्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पुण्यातील कोविड19 च्या परिस्थितीमुळे तेथे पूर्वी प्रमाणेच कामकाज सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेऊन यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बदल होऊ शकतो असेही सूचित केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

all the courts in maharashtra should start working in two shifts from 1st December

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com