आरे कारशेडविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; वृक्षतोड होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) फेटाळल्या. त्यामुळे आता याप्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) फेटाळल्या. त्यामुळे आता याप्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्यासाठी सुमारे अडीच हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याविरोधात अनेक पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. 

आरेतील कारशेड उभारणीसाठी मोठी वृक्षतोड करावी लागणार आहे. त्यामुळे या विरोधात काही पर्यावरणवादी आणि स्थानिकांनीही विरोध दर्शवला. तसेच आरेतील प्रस्तावित कारशेड इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. यासाठी अनेक सेलिब्रिटीही रस्त्यावर उतरले होते. मात्र, आरेतील कारशेड करण्याबाबत राज्य सरकार ठाम होते.

Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'पक्षाने चांगला निर्णय घेतला'

झाडे असल्याने जंगल म्हणता येणार नाही

आरेत केवळ झाडे आहेत. त्यामुळे या भागाला जंगल म्हणता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. सरकारचा हा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने कारशेडविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. 

Vidhan Sabha 2019 : भाजप विधानसभा जिंकणार?; मोदींसह अनेक दिग्गज स्टार प्रचारक!

शिवसेनेची नाराजी

आरेतील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात याचिका करणाऱ्यांना त्यांची बाजू न्यायालयासमोर व्यवस्थित मांडता आली नाही. आरेत मेट्रो कारशेडची उभारणी करण्यासाठी वृक्षतोडीला मान्यता देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Petitions Dismissed against aarey car shed in Mumbai