esakal | लर्निंग लायसन्स आणि नव्या वाहन नोंदणीबाबत निराशाजनक बातमी

बोलून बातमी शोधा

cars

लर्निंग लायसन्स आणि नव्या वाहन नोंदणीबाबत निराशाजनक बातमी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रातील सर्व RTO मध्ये लर्निंग लायसन्स किंवा परमनंट लायसन्सच्या टेस्ट रद्द करण्यात आल्या आहेत. १ मे पर्यंत कुठल्याही खासगी वाहनाची नोंदणी होणार नाहीय. राज्याचे वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. खासगी कार आणि दुचाकी नोंदणी थांबवण्याचा अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. कारण मागच्या वर्षीच्या लॉकडाउनमधुन अर्थव्यवस्था आता कुठे सावरत असताना, आता दुसऱ्या लाटेचा फटका बसलाय.

"आम्ही वाहतूक वाहनांची नोंदणी करण्याबरोबरच प्रलंबित असलेली काम पूर्ण करतोय" असे ढाकणे म्हणाले. अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या वाहनांची नोंदणी प्राधान्याने करण्यासाठी विशेष निर्देश आहेत. वैद्यकीय किंवा इतर इमर्जन्सीसाठी या वाहनांची गरज लागू शकते. उदहारणार्थ रुग्णवाहिका.

हेही वाचा: 'नॅशनल न्यूज नाही', टोपेंच्या विधानावर फडणवीस म्हणतात...

"खासही वाहनांची नोंदणी बंद केलीय. त्यात लॉकडाउन १ मे ला उठणार ? या बद्दल अनिश्चितता आहे. याचा फक्त खासगी वाहनांच्या नोंदणीवरच नाही तर वाहन उद्योगावरही परिणाम होणार आहे" असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. लॉकडाउनमुळे या दहा दिवसात ४२०० कारस आणि बाईकची नोंदणी होऊ शकणार नाही. "ज्यांनी नवीन गाड्या बुक केल्यात, त्यांना डीलर्समार्फत नोंदणीसाठी थांबावे लागेल. सरकारकडून आदेश मिळाल्यानंतरच ही प्रक्रिया पुढे सुरु होईल" असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: 'अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा'

कोविड काळातील एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंतची जी आकडेवारी आहे, त्यानुसार दर महिन्याला ३,४८७ खासगी कार आणि ९,३७४ दुचाकींची दर महिन्याला नोंदणी झालीय. मुंबईत अलीकडेच वाहनांची संख्या ४० लाखाच्या पुढे गेलीय. मुंबई RTO मध्ये ११.६ लाख खासगी गाड्या आहेत आणि २४ लाख दुचाकींची नोंदणी झालीय.