नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी; ठाकरे सरकारचा महिलांना दिलासा

तुषार सोनवणे
Friday, 16 October 2020

महामुंबईतील सर्व महिलांना नवरात्रच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली आहे

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील चाकमान्यासाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी याबाबत मागणी करण्यात येत होती. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने हा निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महामुंबईतील सर्व महिलांना नवरात्रच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.

कन्हैया कुमारने घेतली राज्यातील कॅबिनेट मंत्र्याची भेट; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

ठाकरे सरकाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. कार्यालये सुरू झाली आहेत. परंतु मुंबईतील कार्यालयांपर्यंत पोहचण्यासाठी उपनगरीय लोकल सेवा महत्वाची भूमिका बजावते. लोकल प्रवासास मुभा नसल्याने खासगी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांचे कार्यालयात पोहचण्यास हाल होत होते. त्यामुळे ठाकरे सरकारने महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. महिलांना लोकल प्रवासासाठी क्यूआर कोडचीही गरज नसणार आहे. परंतु त्यासाठी सरकारने काही नियमावली ठरवून दिली आहे. 

ड्रग्स कनेक्शनवरून महाविकास आघाडी फ्रंट फुटवर; महाराष्ट्र पोलिस सेलिब्रेटींसह भाजपनेत्यांचा तपास करणार

महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिली खरी परंतु त्यासाठी सरकारने वेळा ठरवून दिल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 ते शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना प्रवासास परवानगी असणार आहे. यामुळे सकाळी लवकर कामावर जाणाऱ्या महिलांना या निर्णयाचा तुर्तास फायदा होणार नसल्याने त्यांच्यात नाराजी दिसून येत आहे.

All women are allowed to travel in local trains on the backdrop of Navratri; Thackeray government's relief to women

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All women are allowed to travel in local trains on the backdrop of Navratri Thackeray governments relief to women

टॉपिकस