esakal | ड्रग्स कनेक्शनवरून महाविकास आघाडी फ्रंट फुटवर; महाराष्ट्र पोलिस सेलिब्रेटींसह भाजपनेत्यांचा तपास करणार
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रग्स कनेक्शनवरून महाविकास आघाडी फ्रंट फुटवर; महाराष्ट्र पोलिस सेलिब्रेटींसह भाजपनेत्यांचा तपास करणार
  • ड्रग्स कनेक्शन प्रकरणात भाजप आणि महाविकास आघा़डीमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
  • महाविकास आघाडीने भाजपनेते आणि त्यांच्या जवळ असलेल्या सेलिब्रेटींची चौकशी करणार असल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली आहे,

ड्रग्स कनेक्शनवरून महाविकास आघाडी फ्रंट फुटवर; महाराष्ट्र पोलिस सेलिब्रेटींसह भाजपनेत्यांचा तपास करणार

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्स कनेक्शनचे धागेदोरे आता बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रेटींपर्यंत पोहचले आहे. आता विवेक ओबेरॉयच्या मेव्हणा अदित्य अल्वा याचे नाव समोर आले आहे. परंतु अद्यापही विवेकची चौकशी नार्कोटीक्स कंन्ट्रोल ब्यूरो ने केलेली नाही. त्यामुळे मुंबई पोलिस त्याची स्वतंत्र चौकशी करतील तसेच, ड्रग्सप्रकरणात नाव आलेला संदिप सिंह आणि भाजप नेत्यांची चौकशी महाराष्ट्र पोलिसांमार्फत करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

भाजपच्या चित्रा वाघ यांचा यशोमती ठाकूर यांना टोला

ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेला अदित्य आल्वा हा अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आहे. कर्नाटक पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्यांनी मुंबईतील विवेक ओबेरॉयच्या घरी छापाही घातला होता. परंतु त्यानंतरही नार्कोटिक्स कंन्ट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीला विवेक ओबेरॉयची चौकशी करायची नसेल तर, मुंबई पोलिस त्याची स्वतंत्र चौकशी करेन असे गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटले आहे. विवेक ओबेरॉय भाजपचा जवळचा असल्यामुळे त्यांची चौकशी होत नसल्याचा आरोप, कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. 

एनसीबी ड्रग्स प्रकरणाचा तपास करत असताना, संदिप सिंहचे ही नाव समोर आले होते. संदिप सिॆह हा भाजपच्या नेत्यांच्या जवळचा आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची चौकशी करण्याची विनंती सचिन सावंत यांनी अनिल देशमुखांना केली होती. त्यानुसार अनिल देशमुख यांनी दखल घेत. राज्यातील भाजप नेत्यांच्या ड्रग्स कनेक्शन बाबत महाराष्ट्र पोलिस चौकशी करतील असे म्हटले आहे.

Viral Video: 22 व्या मजल्यावरुन स्टंट करणारा तरुण अटकेत

त्यामुळे ड्रग्स कनेक्शन प्रकरणात भाजप आणि महाविकास आघा़डीमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीने भाजपनेते आणि त्यांच्या जवळ असलेल्या सेलिब्रेटींची चौकशी करण्याचे म्हटल्यानंतर भाजप नेते यावर काय ्प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.