
वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळत नाही, तोवर वांद्रे परिसरात एकही वीट रचू देणार नाही.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरासाठी थेट 'मातोश्री'वर धडकणार; मुख्यमंत्र्यांनी वचन न पाळल्याचा आरोप
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळत नाही, तोवर वांद्रे परिसरात एकही वीट रचू देणार नाही. असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2014 च्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. परंतु या प्रश्नी सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा रहिवाशी प्रविण घाडगे यांनी दिला आहे.
शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे अशी येथील कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनेही केली आहेत. परंतु सरकारकडून ठोस आश्वासने मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. कर्मचाऱ्यांना हक्काचे घर देण्याबाबत युती सरकारच्या काळात त्रिसदस्यीय समिती निर्माण करण्यात आली. परंतु या समितीच्या अहवालाचे काय झाले हे आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासकीय वसाहतीमधील रहिवाशी प्रविण घाडगे यांनी पुन्हा सरकारदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा कोविड क्रुसेडर्स 2020 अवॉर्डने गौरव
वांद्रे पूर्व मतदारसंघात 2014 च्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न निकाली लागत नाही, तोवर वांद्रे परिसरात एकही वीट रचू देणार नाही, हे माझे वचन असल्याचे ठोस आश्वासन रहिवाशांना दिले होते. शब्दास पक्के असणारे मुख्यमंत्र्यांनी आपले वचन पूर्ण करावे, अशी मागणी रहिवाशी करत आहेत. या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे, यानंतरही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही मातोश्री निवासस्थानी मोर्चा काढू, असा इशारा, घाडगे यांनी दिला आहे.
------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
Web Title: Allegation Chief Minister Did Not Keep His Promise
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..