मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत फसवणूक; भाजपची राज्यपालांकडे तक्रार

दिलीप यादव
Wednesday, 21 October 2020

महापालिकेच्या एस आणि टी प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये फसवणूकीसह गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप भाजप पालिका नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यासाठी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे.

गोरेगाव : महापालिकेच्या एस आणि टी प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये फसवणूकीसह गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप भाजप पालिका नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यासाठी भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही पालिका भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

सगळ्यांसाठी लोकल ट्रेन कधी सुरू होणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले उत्तर

 
मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष मंगलप्रताप लोढा, पालिका गट नेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक विनोद मिश्रा व अन्य भाजप पालिका पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले. शिंदे आणि मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या दहा नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या निवडणुकीत तिन्ही टप्प्यात योग्य प्रकारे मतदान केल्याचे सांगितले. तसेच भाजप उमेदवार जागृती पाटील यांना दहा मते मिळाल्याची खातरजमा केली. तरी सुद्धा निवडणुकीचा निकल भाजप नऊ विरुध्द शिवसेना दहा असा घोषित करून महापौरांनी पालिका, प्रभाग समितीची फसवणूक केली, असा आरोप भाजप नेत्यांनी केली आहे. 

पोस्ट कोविड आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या, रूग्णालयांचा ‘रिकव्हरी क्लिनिक’वर भर

न्यायालयात दाद मागणार 
निवडणुकीतील सर्व मूळ कागदपत्रांचा ताबा पोलीस आयुक्त कार्यालयाने घ्यावा. अन्यथा या कागदपत्रात फेरफार केला जाण्याची शक्‍यता आहे. त्यावर स्पष्टता येण्यासाठी हस्ताक्षर तज्ञ यांचे सहकार्य घ्यावे लागेल. या आशयाचे पत्र राज्याचे निवडणूक आयुक्त यांनाही दिले आहे. न्यायालयातही याबाबत दाद मागणार आहोत आणि आझाद मैदान पोलीस ठाण्याअंतर्गत घरांना घडली असल्याने, त्या ठिकाणी एफआयआर नोंदविण्यासाठी अर्ज दिला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्यपालांनी मुख्य सचिवांना निर्देश द्यावेत, अशी विनंती भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. 
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegations of fraud in Mumbai Municipal Corporation's ward committee elections; BJP's complaint to the governor