मुदत संपलेल्या गोळ्यांचे विद्यार्थ्यांना वाटप 

मुदत संपलेल्या गोळ्यांचे विद्यार्थ्यांना वाटप 

नवी मुंबई : जानेवारी 2020 मध्ये म्हणजेच पुढील दोन महिन्यांत मुदत संपत असलेल्या रक्तवाढीच्या गोळ्यांचा साठा संपवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या गोळ्या पालिका शाळांना दिल्याचा प्रकार गुरुवारी (ता. 21) उघड झाला आहे. 2018 उत्पादन तिथी असलेल्या या गोळ्या शाळांपर्यंत पोहचवण्यास पालिकेला इतका विलंब कसा लागला, असा प्रश्‍न यातून उपस्थित होत आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ असल्याचा आरोपही होत आहे. 

महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना रक्तवाढीसाठी (आयर्न अँड फॉलिक ऍसिड) च्या गोळ्या दिल्या जातात. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेनेदेखील पालिका शाळांपर्यंत या गोळ्यांचा साठा गुरुवारी पोहचता केला. दर सोमवारी याप्रमाणे तीन महिने विद्यार्थ्यांना या गोळ्या द्याव्यात, अशा सूचनाही आरोग्य विभागामार्फत शाळांना करण्यात आल्या. पुढच्या दीड महिन्यात म्हणजे जानेवारी 2020 पर्यंत या गोळ्यांची मुदत संपत आहे. असे असताना या गोळ्या विद्यार्थ्यांना कशा द्यायच्या, असा प्रश्‍न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही गोळ्या देण्यापूर्वी पुरेशी काळजी न घेतल्याने विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती असतानाही, आरोग्य विभागाकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा कसा होऊ शकतो, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. 

रक्तवाढीच्या गोळ्यांची अंतिम मुदत जानेवारी 2020 असल्यास त्या गोळ्या विद्यार्थ्यांना देण्यात अर्थ नाही. हा गोळ्यांचा साठा बदलण्यास सांगितले जाईल. तसेच शाळांपर्यंत गोळ्या पोहचवण्यास विलंब लागल्याबद्दल संबंधिताना नोटीस काढू. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com