esakal | 'चला संजय पाहू कोण कोणाला शिवथाळी देतं', नारायण राणेंचा थेट इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray narayan rane

'चला संजय पाहू कोण कोणाला शिवथाळी देतं',

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "दोन दिवसांपूर्वी दादरमधील शिवसेना भवनसमोर (shivsena bhavan) राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदारा राडा (shivsena bjp clash) झाला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी संजय राऊत (sanjay raut) यांनी 'काल प्रसाद दिला, आता शिवभोजन थाळी द्यायला लावू नका' असे वक्तव्य केले होते" त्याचा आज खासदार आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी समाचार घेतला. (Bjp mp & leader narayan rane slam sanjay raut & warn shivsena)

"मी भाजपाचा सदस्य आहे. महिलांवर ज्यांनी अत्याचार केले, त्यांचे हात-पाय विसरणार नाही. पुढे शिवथाली कोण कोणाला देत ते पाहू. ही भाषा तुमच्या तोंडी शोभते का? तुम्ही राष्ट्रवादीत आहात की शिवसेनेत? शिवसेनेचा पुळका स्वार्थापोटी आहे" अशा शब्दात नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.

हेही वाचा: ९८ दिवसानंतर पहिल्यांदाच कल्याणमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

"संजय राऊत यांनी दादागिरीची भाषा करु नये. प्रसाद वाटत असाल, तर प्रसादाची परतफेड कशी द्यायची हे आम्ही शिकलो आहेत. शिवसेनेत असतानाच हे शिकलो आहे असे नारायण राणे म्हणाले. स्वत:ला सांभाळा अन्यथा तुमच्या वाट्याला शिवथाळी कधी येईल ते समजणार नाही. आजची शिवसेना माननीय बाळासाहेबांची शिवसेना नाही. ही आदित्य, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे" असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा: मुंबईत लसीला प्रचंड डिमांड, २० लाख डोसची मागणी

"संजय राऊतांना शिवसेना भवन आणि शिवसेनेचा इतिहास सांगण्याचा अधिकार नाही. तुमची वायफळ बडबड लोक ऐकत नाहीत, चेष्टा करतात. संजय राऊत कधी कोणाला थप्पड मारु शकले नाहीत, ते धमक्या देतात आश्चर्य वाटतं" असं राणे म्हणाले. 'चला संजय पाहू कोण कोणाला शिवथाळी देतं' असा थेट इशाराच राणेंनी दिला.

loading image