esakal | महावितरणच्या 'त्या' आवाहनाला तब्बल 3 लाख नागरिकांचा प्रतिसाद...
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या 'त्या' आवाहनाला तब्बल 3 लाख नागरिकांचा प्रतिसाद...

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत जातोय. त्यातच तिसरा लॉकडाऊनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळातही महावितरण अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे.

महावितरणच्या 'त्या' आवाहनाला तब्बल 3 लाख नागरिकांचा प्रतिसाद...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत जातोय. त्यातच तिसरा लॉकडाऊनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळातही महावितरण अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. याचवेळी महावितरणानं नागरिकांना आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यातल्या जवळपास 3 लाख 63 हजार वीज ग्राहकांनी पोर्टल आणि मोबाइल अॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे मीटर रीडिंग स्वतःहून पाठवले आहे. 

लॉकडाऊनमुळे महावितरणाला प्रत्यक्ष रीडिंग घेणं अशक्य आहे. त्यामुळे रीडिंग प्रक्रिया पुन्हा सुरु होईपर्यंत वीजग्राहकांन मोबाईल अॅप आणि वेवसाईटमध्ये लॉग इन करुन त्यात दिलेल्या मुदतीत मीटर रीडिंगचा फोटो अपलोड करुन आपल्या वीज मीटरचं रीडिंग पाठवावं, असं आवाहन महावितरणानं केलं होतं. त्यानुसार महावितरणाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जवळपास 3 लाक 63 हजार हजार ग्राहकांनी आपलं मीटर रीडिंग स्वतःहून महावितरणाकडे पाठवलं. त्यानुसार या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणनं बिल दिलं आहे. 

कोरोनावर लस येण्याची शक्यता धुसर? चिंता वाढवणारा अहवाल

तसंच सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करण्याचंही आवाहन महावितरणनं केलं होतं. लॉकडाऊनमुळे महावितरणने गेल्या 23 मार्चपासून वीज ग्राहकांकडे जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती खंडीत केली आहे. त्यासोबतच बिलांची छपाई करणं आणि त्यांच वितरण देखील बंद केलं आहे. काही ग्राहकांच्या मोबाईलवर महावितरण अंदाजे रक्कम असलेलं बिलही पाठवत आहे.

मीटर रीडिंगच्या आवाहनामध्ये पुणे परिमंडळातील सर्वाधिक 69 हजार 912 तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडळातील 58 हजार 210 वीज ग्राहकांचा समावेश आहे. 

कसं पाठवता येईल मीटरचं रीडिंग 

www. mahadiscom.in ही महावितरणची वेबसाइट आहे. तसंच महावितरण मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना आपल्या मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वतः रीडिंग घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. 

या रीडिंगनुसार वीज वापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवण्याचे आवाहन महावितरणनं केल होतं. त्यानंतर ग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाइलवर SMS पाठवला जातो. त्या SMS मध्ये मीटर रीडिंग पाठवण्याची मुदत नमूद केली जात आहे. 

लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

खालील ठिकाणांहून आवाहनाला प्रचंड प्रतिसाद 

 • पुणे - 69912
 • कल्याण- 58210
 • भांडूप- 37543
 • नागपूर- 27720
 • नाशिक- 25831
 • कोल्हापूर- 22728
 • बारामती- 20941
 • जळगाव- 17664
 • औरंगाबाद- 16374
 • अकोला- 13767
 • अमरावती- 13540
 • चंद्रपूर- 8824
 • कोकण- 8543
 • नांदेड- 7348
 • गोंदिया- 7268
 • लातूर- 6963

या परिमंडळामधील ग्राहकांनी महावितरणाच्या या आवाहना मोठा प्रतिसाद दिला.

almost three lac people send their meter reading to mahavitaran

loading image