

Alok Kumar Murdered In Mumbai Local Shocking Family Revelation
Esakal
मुंबई, ता. २५ : लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात होऊन एका प्राध्यापकाचा बळी जाण्याची धक्कादायक घटना मालाड रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी घडली. आलोककुमार सिंग (वय ३२, रा. मालाड पूर्व) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. संशयित आरोपीला बोरिवली रेल्वे पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे.