

Special Role for Sanjay Raut With Thackeray Brothers
esakal
Maharashtra Political Developments : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना मानवंदना देत ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या दिवशी, ठाकरे बंधूंच्या शेजारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना खुर्ची देण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.