esakal | कोरोनामुळे अडलं हापूसचं घोडं, वाचा काय झालंय...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे अडलं हापूसचं घोडं, वाचा काय झालंय...

कोरोनाचा आंबा निर्यातीवरही परिणाम, 80 टक्के निर्यात बंद; उत्पादकांना फटका बसण्याची शक्‍यता 

कोरोनामुळे अडलं हापूसचं घोडं, वाचा काय झालंय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा हापूस आंब्याच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. सरकारने आखाती देशांच्या विमानसेवेवर निर्बंध घातल्यामुळे हवाईमार्गे होणारी 80 टक्के आंबा निर्यात बंद पडली आहे. 

दरवर्षी एकूण हापूस आंब्यापैकी तब्बल 40 टक्के आंब्याची निर्यात केली जाते. आखाती देश, युरोप, अमेरिका खंडातील देशांमध्ये हापूस आंब्याला चांगली मागणी असते, परंतु परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने परदेशात जाणाऱ्या काही विमानसेवांवर बंदी घातली आहे.

मोठी बातमी - आता मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व रेल्वे 'नाना शंकरशेठ' स्थानकातून सुटणार...

गेल्या आठवडाभरापासून आखाती देशांतील विमान सेवा बंद केल्यामुळे आंबा निर्यात बंद पडली आहे. कतार आणि कुवेत या देशांमध्ये हवाईमार्गे होणारी आंबा निर्यात पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. समुद्रामार्गे आखाती देशांमध्ये 20 टक्के आंबा निर्यात केला जात होता; मात्र कुवेत आणि कतार या देशांनी आपल्या सीमा बंद केल्यामुळे जलवाहतुकीद्वारे सुरू असणारी निर्यातही बंद पडण्याची दाट शक्‍यता आंबा निर्यातदारांकडून वर्तवली जात आहे. 

मोठी बातमी -  महाविकास आघाडीतील 'जोतिरादित्य सिंधीया'वर अजित पवार म्हणतात, आमच्यात...

तसेच केंद्र सरकारने 15 एप्रिलपर्यंत व्हिसा बंद केल्यामुळे पुढील 15 दिवस आंब्याची निर्यात पूर्णपणे बंद राहणार आहे. सध्या आंब्याचा सुरुवातीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त फटका बसणार नाही, परंतु एप्रिल-मे महिन्यातील मुख्य हंगामादरम्यान हीच परिस्थिती कायम राहिल्यास निर्यातबंदीचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्‍यता निर्यातदार संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे. 

Alphonso exports or halt due to threat of corona virus 

loading image