आता मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व रेल्वे 'नाना शंकरशेठ' स्थानकातून सुटणार...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी २०१७ मध्ये लोकसभेत मुंबईतल्या इंग्रजी नावं असलेल्या रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा मुद्दा मांडला होता. त्याच धर्तीवर एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं प्रभादेवी असं नामांतर  करण्यात आलं होतं.  आता ठाकरे सरकार मुंबईच्या आणखी एका स्टेशनचं नामांतर करणार आहे. 

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी २०१७ मध्ये लोकसभेत मुंबईतल्या इंग्रजी नावं असलेल्या रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा मुद्दा मांडला होता. त्याच धर्तीवर एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं प्रभादेवी असं नामांतर  करण्यात आलं होतं.  आता ठाकरे सरकार मुंबईच्या आणखी एका स्टेशनचं नामांतर करणार आहे. 

हेही वाचा: "माझ्या घोषणांमुळेच महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण"- रामदास आठवले...

मुंबईत पश्चिम रेल्वेवरच्या आणखी एका स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे. लोकलच्या प्रवाशांनी गजबजलेल्या 'मुंबई सेंट्रल' रेल्वे स्थानकाचं नामांतर करण्यात येणार आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार 'नाना शंकरशेठ' यांच्या नावानं हे स्थानक आता ओळखलं जाणार आहे. ठाकरे सरकारनं या नामांतरासाठी मंजुरी दिली आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचं ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ स्टेशन असं नामकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हे नामकरण करण्यात येणार आहे. 

‘जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे’ यांचं नाव आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्यात येणार आहे. भारतातली पहिली रेल्वे कंपनी ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ च्या पहिल्या संचालकांमध्ये ते एक होते. त्यामुळेच त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असंही संबोधलं जात होतं. 

हेही वाचा: करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशांचा गजर 

कोण होते नाना शंकरशेठ:

  • नाना शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ ला मुंबईजवळच्या मुरबाडमध्ये झाला होता.
  • नाना शंकरशेठ हे अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी होते. 
  • सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.
  • त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला होता.
  • सार्वजनिक कामांसाठी हे पैसे त्यांनी खर्च केले होते.
  • १८४८ मध्ये नाना शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली होती.
  • सती प्रथेला बंदी घालण्याच्या कायद्याला त्यांचा पाठिंबा होता. 
  • सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
  • जे.जे. हॉस्पिटल सुरु होण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

Maharashtra government going to change name of Mumbai central railway station read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government going to change name of Mumbai central railway station read full story