आधीच वादात असलेल्या 'त्या' पालिकेने घातला नवा 'घोळ'; मग काय, मनसेनं केला पर्दाफाश

checkup
checkup

ठाणे : कोरोनाबाधित रुग्ण व मृतदेहाची अदलाबदल करण्याचे प्रताप करणाऱ्या ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 30 मे ला कोरोनामुक्त झालेल्या वर्तकनगरमधील 35 वर्षीय तरुणाला पुन्हा कोरोनाबाधितांच्या यादीत टाकून सतावण्याचा उद्योग करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांकडून वारंवार फोन करून क्वारंटाईन होण्यासाठी धमकावल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. त्यानंतर मनसेने ही बाब चव्हाट्यावर आणली. दरम्यान, शिवाईनगर परिसरातही असाच आणखी प्रकार उघडकीस आल्याने पालिकेच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

ठाणे पश्चिमेकडील वर्तकनगरमधील दोस्तीविहार इमारतीत राहणारा 35 वर्षीय तरुण रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. लॉकडाऊनमुळे गेले चार महिने रिक्षा व्यवसाय ठप्प असल्याने या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आहे. अशातच 21 मे ला कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर या तरुणाला 25 मे रोजी ठाणे महापालिकेच्या होरीझन कोव्हिड रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. 30 मे ला कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयाने रितसर डिस्चार्ज देऊन 6 जूनपर्यंत घरातच होमक्वारंटाईन राहण्याबाबतचे लेखी पत्रही रुग्णाला दिले. तरीही, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत असल्याचे फोन गेल्या काही दिवसांपासून येऊ लागल्याने हा तरुण व त्याचे कुटुंबीय हादरून गेले आहेत.

ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीमधून आणि वर्तकनगर पोलिसांकडून वारंवार फोन येत असल्याने या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने पालिकेच्या या भोंगळ कारभारावर मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी टीका केली आहे. ठाणे महापालिकेचा एकप्रकारे कोरोना रुग्ण वाढवण्याचा अट्टाहास सुरू असल्याने या संपूर्ण भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी विचारे यांनी केली आहे.

आरोग्य विभागात नाही ताळमेळ 
कोरोना बाधित, संशयित रुग्णांसह क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असते. या विभागाकडूनच संबंधित प्रभाग समिती आणि त्या-त्या क्षेत्रातील पोलिस ठाण्यांना पाठवली जाते. त्यानुसार, रुग्णाला कोव्हिड रुग्णालय अथवा क्वारंटाईन केंद्रात पाठवण्याची पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे, पोलिस अथवा प्रभाग समितीची कोणतीच चूक नसल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट करीत आरोग्य विभागातच ताळमेळ नसल्याचे सांगितले. तर, पोलिसांनीही या प्रकरणात आपली चूक नसल्याचे म्हटले आहे.

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीबाबत असा प्रकार घडला असल्यास त्याची सखोल माहिती आरोग्य विभागाकडून मागवून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे पालिका

(संपादन : वैभव गाटे)

the already disputed thane municipality has added a new dimension mns exposed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com