'वीज बिल गेले चुलीत' म्हणत अनोखं होळी आंदोलन 

संजय शिंदे
Saturday, 18 July 2020

आदिवासी पाड्यांवर विज बिलांची होळी

मुंबई: एकतर लॉकडाऊन त्यात सरासरीने आलेली काहीच्याकाही वाढीव वीज बिले, यामुळे मुंबईकर पुरते वैतागलेत. याच पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमधील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत आदिवासी पाड्यांमध्ये एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील विविध आदिवासी पाड्यांवर 'वीज बिल गेले चुलीत', असं म्हणत वीज बिलांची होळी करण्यात आली.

आम आदमी पक्ष व 'कष्टकरी शेतकरी संघटने'च्या सहभागाने विठ्ठल लाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. लाॅकडाऊनमुळे आधीच सामान्य, मजूर, आदिवासींचा रोजगार हिरावला आहे. या संकटात वाढील बिलाने आणखी भर घातली आहे. त्यामुळे 'वीज नको; पण बिल आवर', असे म्हण्ण्याची वेळ सामान्यावर आल्याचे विठ्ठल लाड यांनी म्हटले आहे.

BIG NEWS - मुंबईतील कोरोना दोन आठवड्यात आटोक्यात येणार, पुण्यातील कोरोना आटोक्यात येण्यास लागणार...

याविरोधात अनेक पाड्यांवर घरोघरी यासोबतच बऱ्याच ठिकाणी सामूहिकरित्या वीज देयकांची होळी करण्यात आली. वीज बिल माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी झालेल्या आंदोलनात नागरिकांनीही उत्सफुर्त सहभाग घेतला.

कोरोनाच्या संकटकाळात सामान्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात वीजेबद्दल दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करायची, हीच योग्य वेळ असल्याचे लाड यांनी सांगितले आहे.

मोठी बातमी - UGC च्या निर्णयाविरुध्द सुप्रीम कोर्टात धाव, अंतिम वर्षाच्या परिक्षेचा तिढा सर्वोच्च न्यायालयात

( संकलन - सुमित बागुल )

unique holi agitation against electricity bills at dharavi mumbai

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unique holi agitation against electricity bills at dharavi mumbai