esakal | अंबानींच्या घरासमोरील ती कार मुंबईतल्या 'या' भागातून गेली होती चोरीला

बोलून बातमी शोधा

अंबानींच्या घरासमोरील ती कार मुंबईतल्या 'या' भागातून गेली होती चोरीला}

रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली.सात ते आठ दिवसांपूर्वी ही गाडी चोरी झाली होती.

अंबानींच्या घरासमोरील ती कार मुंबईतल्या 'या' भागातून गेली होती चोरीला
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. त्यात जिलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि  नाशक पथकाच्या मदतीने जिलेटीनच्या कांड्या सुखरुप बाहेर काढण्यात आल्या आहेत. दरम्यान संशयास्पदरित्या स्फोटक भरून आलेली गाडी ही विक्रोळी येथून चोरी झाल्याची माहिती आता समोर येत आहे.  

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ कार ही मुंबईतल्या विक्रोळी या भागातून चोरीला गेली होती. सात ते आठ दिवसांपूर्वी ही गाडी चोरी झाली होती. तशी तक्रार विक्रोळी पोलिस ठाण्यात केली असल्याची माहिती मिळतं आहे. यावरून आरोपींनी संपूर्ण कट रचूनच हा फक्त इशारा दिला होता.

तसंच स्फोटकांची गाडी ६०० मीटर अंतरावर ठेवण्यापूर्वी आरोपींनी मर्सिडीज गाडीतून अंबानी यांच्या घरासमोर असलेल्या पालिकेच्या पार्किंगमध्ये गाडी ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी गाड्यांची नोंद ठेवली जात आहे हे लक्षात आल्यानंतर आरोपींनी तेथे गाडी न ठेवता निघून गेले. त्यामुळे त्या संशयास्पद गाडीची माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र जशाच्या तसं

ये तो सिर्फ ट्रेलर है

निता भाभी मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है! 
अअगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे पुरेसा मे लिखो उडाने के लिए . इंतजाम हो गया है!

संभल जाना

अंबानीच्या बंगल्याजवळ जिलेटिनं भरलेली कार

अंबानी यांच्या एन्टेलिया या घराजवळील कारमिचेल रोडवर ही हिरव्या रंगाची कार संशयितरित्या उभी करण्यात आली होती. संध्याकाळी या कारबाबत माहिती मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक  आणि नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या तपासणीत स्कॉर्पिओ कारमध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या  सापडल्या. पण स्फोट घडवण्याच्या दृष्टीने हे जिलेटीन एक्लोझीव डिवाईसला जोडण्यात आले नव्हते. याप्रकरणी गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा- संजय राठोड यांच्यावरील दबाव वाढला, अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता

हिरव्या रंगाची ही कार दुपारपासून उभे होती. बराच काळ ही स्कॉर्पिओ तेथे उभी असल्यामुळे परिसरात विचारण्यात आले. पण तेथे ती कार कोणाचीच नसल्यामुळे अखेर स्थानिक गावदेवी पोलिसांना कारची माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले. बॉम्ब शोधक पथकांच्या श्वानांनी त्यात संशयास्पद स्फोटके असल्याचे संदेश दिल्यानंतर खबरदारी घेऊन त्या जिलेटीन बाहेर काढण्यात आल्या. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला देण्यात आला आहे. 

Ambani house Explosive car theft from vikhroli security deployed FIR registered