संजय राठोड यांच्यावरील दबाव वाढला, अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता

संजय राठोड यांच्यावरील दबाव वाढला, अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राठोड यांची कानउघडणी करण्यात आली आहे. मी निर्णय घेण्याआधी तू घे, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावल्याचं समजतंय. 

संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी होत आहे. विरोधकही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा नाराज असल्याचं बोललं जात आहे. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपही संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झाली आहे. त्यामुळे संजय राठोड हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे. 

दुसरीकडे संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याची भूमिका भाजपनं घेतली आहे. संजय राठोड  यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार असं बोललं जात आहे, मग हे सरकार कसली वाट पाहतय. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देणारं हे सरकार आहे. संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नसल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

शरद पवार नाराज?

पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. यावर संजय राऊत यांना विचारलं असा मला यासंदर्भात कुठलीही माहित नाही, असं त्यांनी सांगितलं.

संजय राऊत काय म्हणाले? 

मंगळवारी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमली होती. एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट असताना ही गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाची परिस्थिती पाहता जमलेली गर्दी गंभीर होती. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात.  काल जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं आहे.  मुख्यमंत्र्यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Pooja Chavan Case Sanjay Rathod likely resign before the budget session

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com