bjp with congress
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) नगरपालिकेच्या राजकारणात भा जपसोबत युती करणे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला चांगलेच महागात पडले आहे. पक्षाची परवानगी न घेता भाजपसोबत 'अंबरनाथ विकास आघाडी' स्थापन केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मोठी कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह निवडून आलेल्या सर्व १२ नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तसेच अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ता समीकरणाची घडी विस्कटली आहे.