

Major Political Turn In Ambarnath
Esakal
नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाला तीन आठवडे होण्याच्या आतच अंबरनाथमध्ये मोठी उलथापालथ झालीय. भाजप राष्ट्रवादीसोबत काँग्रेसच्या नगरसेवकांनी युती केल्यानं खळबळ उडाली होती. याविरोधात काँग्रेसनं कारवाई करत १२ नगरसेवकांना निलंबित केलं. या निलंबनाच्या कारवाईनंतर आता १२ नगरसेवक थेट भाजपमध्ये गेले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.