अंबरनाथमध्ये खड्ड्यांभोवती रांगोळ्या 

अंबरनाथ : खड्ड्यांभोवती काढण्यात आलेल्या रांगोळ्या
अंबरनाथ : खड्ड्यांभोवती काढण्यात आलेल्या रांगोळ्या

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भालचंद्र भोईर प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात आले. अंबरनाथ शहराच्या बारकूपाडा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून नंतर नागरिकांच्या स्वाक्षरीही घेण्यात आल्या.
 
अंबरनाथमधील परांजपे चाळ, बारकू पाडा परिसराला लागून असलेला भाग नव्याने विकसित होत असून येथे मोठ्या प्रमाणात नवीन गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. मात्र, असे असूनही या भागाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे. रिलायन्स रेसिडेन्सी चौकात तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांच्या या दुरवस्थेला कंटाळून भालचंद्र भोईर प्रतिष्ठानच्या वतीने नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी येथील खड्ड्यांच्या भोवताली रांगोळी काढत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. 

या आंदोलनाला येथील खड्ड्यांनी त्रासलेल्या नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला. या आंदोलनाद्वारे नगरपालिका प्रशासनाचे खड्ड्यांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न असून 15 दिवसांत खड्डे बुजवले नाहीत, तर पुढील आंदोलन नागरपालिकेत करू, असा इशारा या वेळी मनीषा भोईर यांनी दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com