Ambedkar Memorial Indu Mill: इदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे

१२ एकर जागेतील या स्मारकाचे बांधकाम (सिव्‍हिल वर्क) झाले पूर्ण च साडेतीनशे फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे | The construction (civil work) of this monument in 12 acres of land has been completed and a statue with a height of three and a half hundred feet will be erected.
Ambedkar Memorial Indu Mill: इदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे
Ambedkar Memorial Indu Millsakal
Updated on

बापू सुळे

Mumbai News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून उभारण्यात येत आहे. (indu mill ambedkar statue )

तब्बल १२ एकर जागेतील या स्मारकाचे बांधकाम (सिव्‍हिल वर्क) पूर्ण झाले आहे. या ठिकाणी साडेतीनशे फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. आंतरराष्‍ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार हे लवकरच या पुतळ्याचे काम सुरू करणार आहेत. त्यानंतर स्मारकाची इतर कामे पूर्ण केली जाणार आहेत.(Other works of the memorial are to be completed)

Ambedkar Memorial Indu Mill: इदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे
Mumbai Local News: मुंबईकरांना दिलासा! आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॅाक नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा संदेश जगभरात पोहोचावा, त्यांचे अनमोल कार्य येणाऱ्या पिढ्यांना समजावे, त्याचा अभ्यास करता यावा म्हणून राज्य सरकारने इंदू मिलच्या जागेवर तब्बल १,०८९ कोटी रुपये खर्चून ४५० फूट उंचीचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. १०० फूट उंचीचा विस्तीर्ण चौथरा असून त्याच्या मध्यभागी चैत्य हॉल, लायब्ररी, म्युझियम, विश्रांतिगृह अशा वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत. तसेच बाबासाहेबांचा ३५० फूट उंचीचा ब्राँझचा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. सध्या स्मारकाचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Ambedkar Memorial Indu Mill: इदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे
Mumbai Crime News: क्यूआर कोडमुळे मुलाची पालकांशी पुन्हा झाली भेट; वाचा नक्की काय घडलं

शंभर वर्षे सुस्थितीत राहावा, यासाठी सिमेंट काँक्रीटचा आणि स्टीलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुतळ्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण स्मारकाचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

२२ हजार चौरस फुटांची भव्य लायब्ररी

स्मारकाच्या मुख्य भागात तब्बल २२ हजार चौरस फूट एवढ्या विस्तीर्ण जागेत लायब्ररी असणार आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा, त्यांचे राजकीय कार्य आदींबाबतची वेगवेगळी पुस्तके, संदर्भग्रंथ अभ्यासासाठी उपलब्ध असणार आहेत. येथे एका वेळी २१० लोकांना अभ्यासासाठी बसता येणार आहे. तसेच व्याख्यान, कार्यशाळा आणि इतर बाबींसाठी चार अत्याधुनिक लेक्चर रूम असणार आहेत.

Ambedkar Memorial Indu Mill: इदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे
Mumbai News : कार्यक्षम ‘लोकसंख्ये’च्या ताकदीची दखल घ्यायला हवी

वैशिष्ट्ये

- १२ एकर जागेत विस्तीर्ण स्मारक

- एकूण उंची ४५० फूट असणार आहे, तर पुतळ्याची उंची ३५० फूट

- १,०८९ कोटी रुपये एकूण खर्च

- पुतळ्याचे एकूण वजन ६ हजार मेट्रिक टन

- पुतळ्यावरील ब्राँझचे आवरण ८५० मेट्रिक टन

- ४७० वाहने पार्क करण्यासाठी दुमजली बेसमेंट पार्किंग

सरकारने कामाला गती द्यावी ः आनंदराज आंबेडकर

सध्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले असले, तरी स्मारकाच्या एकूण कामाचा विचार करता ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळा उभारण्याबरोबरच इतर फिनिशिंग वर्क बाकी असून ते पूर्ण होण्यास दोन-अडीच वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सरकारने स्मारकाच्या कामाचा वेग वाढवावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. इंदू मिलची जागा स्मारकासाठी मिळावी म्हणून त्यांनी मोठे आंदोलन उभा केले होते.

Ambedkar Memorial Indu Mill: इदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे
Mumbai Local News: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com