

Ambernath BJP And MNS Clash
ESakal
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून त्यांच्यात मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. नुकतेच अंबरनाथमधील एका गाळ्याच्या ताब्यावरून भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने भिडले होते. यावेळी मनसे आणि भाजपमध्ये मोठा वाद झाल्याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक कऱण्यात आली होती. परंतु भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल न झाल्याने मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले होते. त्यानंतर आता या राडा प्रकरणी भाजपच्या नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.