

Man throws cat from 12th floor
ESakal
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालेगाव परिसरातील रॉयल फ्लोरा गृहसंकुलात एका मांजरीला १२व्या मजल्यावरून खाली फेकल्याचा आरोप प्राणीप्रेमींनी केला आहे. यात मांजरीचा जागीच मृत्यू झाला असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.