

Ambernath Crime
ESakal
अंबरनाथ : अंबरनाथ येथील जुना भेंडीपाडा परिसरात मित्रांमधील चिडवाचिडवी आणि वादातून एका १७ वर्षीय मुलाची लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (ता. २१) घडली. शोएब सिद्दिकी ( १७) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.