

Disable person crossing railway track
ESakal
मुंबई : मुंबई लोकलच्या अपघाताच्या घटना घडत असल्याचे सातत्याने समोर येत राहतात. ज्यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना होत असणाऱ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे रेल्वे रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले जाते. मात्र असे असले तरीही अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे दिसून येते. अशातच मुंबई लोकलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडत असून त्याचा जीव धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे.