Traffic Diversion on Vote counting day
ESakal
मुंबई
Thane Traffic: मतमोजणी दिवशी वाहतुकीत बदल, अनेक मार्गांवर प्रवेश बंद; काय असतील पर्यायी मार्ग?
Ambernath Traffic Route Change: ३ डिसेंबर रोजी अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यामुळे कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी महात्मा गांधी विद्यालयात होणार आहे. या दिवशी राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

