esakal | अवजड वाहनांच्या वाहतुक कोंडीत रुग्णवाहिकांची घुसमट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अवजड वाहनांच्या वाहतुक कोंडीत रुग्णवाहिकांची घुसमट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : मुंब्रा (Mumbra) बायपास रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक नवी मुंबईमार्गे (Navi Mumbai) वळविण्यात आली आहे. यामुळे ठाणे (Thane- Belapur) बेलापूर रस्त्यासह पटनी (Patni) कंपनीजवळ (Company) मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही(ambulances) बसत असून रुग्‍णाच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयांमध्ये ऐरोली, दिघा, घणसोली, कोपरखैरणे येथील रुग्णांना घेऊन जाण्यात येते. त्याचप्रमाणे ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये ठाणे, मुंबईतील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. शिवाजी रुग्णालयातील रुग्णांना देखील उपचारांसाठी सायन, जे.जे रुग्णालय, वाडिया, केईएम येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात येते. यावेळी ठाणे-बेलापूर मार्ग महत्वाचा मार्ग ठरतो. मात्र ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका रुग्णांना बसत आहे.

कळवा येथील तिसऱ्या पुलांचे काम सुरू असल्यामुळे कळवा पुलापासून ते ऐरोलीतील माईंड स्पेस कंपनीपर्यंत सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या राग लागतात. अवजड वाहनांच्या कोंडीतून रुग्णवाहिका काढताना चालकाला अक्षरशः कसरत करावी लागते. मुकूंद कंपनी सर्कलजवळून अवजड वाहने ही मुंबई मार्गे वळविण्यात आली आहे. तर विरुद्ध बाजूने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी कळवा पोलिस मुकूंद कंपनीजवळ नाकाबंदी करीत आहे.

हेही वाचा: राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

रुग्‍ण, नातेवाइकांमध्ये संताप

गेल्‍या चार -पाच दिवसांपासून दररोज सात ते आठ रुग्णवाहिका सायरन वाजवत वाहतूक कोंडीतून मार्ग काढत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. अवजड वाहनांमुळे रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकत असल्‍यामुळे रुग्णाला घेऊन जाणारे नातेवाइकांमधून संताप व्यक्त होत आहे.

loading image
go to top