esakal | सध्याच्या जीवनशैलीमुळे किडणी, मूत्रविकार सहा पटीने वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

सध्याच्या जीवनशैलीमुळे किडणी, मूत्रविकार सहा पटीने वाढले

सध्याच्या लाईफस्टाईलमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधी मागे लागत असून त्यामुळे मुत्रपिंड आणि मुत्रविकारचे आजार वाढू लागले आहेत.

सध्याच्या जीवनशैलीमुळे किडणी, मूत्रविकार सहा पटीने वाढले

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई,ता.15 : सध्याच्या लाईफस्टाईलमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधी मागे लागत असून त्यामुळे मुत्रपिंड आणि मुत्रविकारचे आजार वाढू लागले आहेत. त्यातच पेनकिलर औषधांच्या अतिरीक्त सेवनामुळेही मुत्रपिंडावर परीणाम होत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात मुत्रपिंड तसेच मुत्रविकाराबाबत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार वर्षात चार ते सहा पटींने वाढली आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 2013-14 मध्ये 9800 मुत्रपिंड विकाराचे तर 5430 मुत्रविकाराच्या रुग्णांवर उपचार झाले होते. तर, 2018-19 मध्ये मुत्रपिंडाचा विकार असलेले 60 हजार 100 रुग्णांवर उपचार झाले. तर मुत्र विकाराच्या 21 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार झाले. तर, 2019-20 मध्ये मुत्रपिंडाचे रुग्ण 60 हजार 400 आणि मुत्रविकाराचे रुग्ण 21 हजारापर्यंत राहाणार आहे. मुत्रपिंडाचे विकार वाढण्यामागे प्रमुख कारण बदलती जिवनशैली आणि त्यामुळे वाढलेले मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे आजार मानले जात आहे. केईएम 2013-14 मध्ये मुत्रपिंडाच्या 2482 रुग्णावर उपचार करण्यात आले. तर, 2018-19 मध्ये ही संख्या 3826 पर्यंत पोहचली.

महत्त्वाची बातमी : '10 च्याआत घरात'मुळे खवय्यांचा प्रतिसाद कमी, व्यवसाय यथातथाच होत असल्याची हॉटेल चालकांची खंत

परळ येथील केईएम रुग्णालयातील मुत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. तुकाराम जामळे हे मधुमेह आणि उच्च रक्तदाबा बरोबरच अतिरीक्त प्रमाणात घेतलेल्या पेनलकिलरही मुत्रपिंडाच्या आजाराला कारण मानतात. मुत्रपिंडाचे रुग्ण वाढलेलेच आहेत. त्याचबरोबर वेळीच लक्ष न दिल्याने डायलिसीसवरील रुग्णांची संख्याही वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

साधारणत: मुत्रपिंडाचे आजार अंतिम टप्प्यात पोहचल्यानंतर त्याच्याकडे गांभिर्याने बघितले जाते. यात, पायाला, चेहऱ्याला सुज येण्यासारखे प्रकार दिसू लागल्यावर उपचार सुरु केले जातात. त्यामुळे डायलिसेसचे अंतिम टप्प्यातील उपचार करावे लागतात. वेळीच या आजारांचे निदान झाल्यास औषधांवरही आजार नियंत्रणात ठेवता येतो.

महत्त्वाची बातमी : आयकर सहआयुक्तांच्या नावाने बनवलं फेक फेसबुक अकाउंट आणि सुरु केली पैशांची मागणी

काय करावे
- शरीरातील मेद आणि चरबी नियंत्रणात ठेवावी.
- शरीरातील शर्करा आणि रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे.
- वारंवार पेन किलर खाणे टाळावे.

मधुमेह आणि रक्तदाच्या रुग्णांनी काय करावे
- वेळोवेळी चाचण्या करुन घ्याव्यात.
- लघवी पुर्ण होत नसल्यास, लघवीच्या जागेवर दुखत असल्यास तत्काळ चाचणी करुन घ्यावी.

( संपादन - सुमित बागुल )

amid corona due to lockdown disease related to kidney and urine infection increased by six times