esakal | आयकर सहआयुक्तांच्या नावाने बनवलं फेक फेसबुक अकाउंट आणि सुरु केली पैशांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

आयकर सहआयुक्तांच्या नावाने बनवलं फेक फेसबुक अकाउंट आणि सुरु केली पैशांची मागणी

महिला आयकर सहआयुक्ताच्या नावाने दोन बनावट फेसबुक खाती  तयार करून मित्रांकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयकर सहआयुक्तांच्या नावाने बनवलं फेक फेसबुक अकाउंट आणि सुरु केली पैशांची मागणी

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई, ता.15 : महिला आयकर सहआयुक्ताच्या नावाने दोन बनावट फेसबुक खाती  तयार करून मित्रांकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने प्रोफाइल तयार करण्यासाठी या महिला आधिका-याचे छायचित्र व नावाचा वापर केला होता व त्यानंतर तिच्या मित्रांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली होती.

तक्रारदार स्मिता वर्मा या पेडर रोड येथील आयकर कॉलनीतील रहिवासी आहेत. त्यांच्या परिचयाच्या शैलेंद्र पांडे नावाच्या व्यक्तींने त्यांना 10 ऑक्टोबरला दूरध्वनी केला होता. त्यावेळी त्याने वर्मा यांचे छायाचित्र व नाव असलेल्या प्रोफाईलकडून फ्रेन्ड रिक्वेस्ट आल्याचे सांगितले. त्यावेळी त्या प्रोफाईलवर एका मुलीचेही छायाचित्र होते. त्यात वर्मा यांची मुलीचा अपघात झाल्यामुळेत त्यांना 15 हजार रुपयांची गरज असल्याचेही लिहिले होते. त्या संदेशात मोबाईल क्रमांक व पैसे पाठवण्यासाठी यूपीआय क्रमांकही देण्यात आला होता. त्यावेळी वर्मा यांनी ते प्रोफाईल आपले नसून आपल्याला कोणत्याही पैशांची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : "तुमचं कार्यालय वरळीला आहे आणि फ्लोरा फाऊंटन तिथून जवळ आहे" म्हणत सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकला फटकारलं

त्यानंतर वर्मा यांनी त्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉर्ट काढून पाठवण्यात सांगितले. तो प्राप्त झाल्यानंतर वर्मा यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गावदेवी पोलिसांनी भादंवि कलम 419, 420 व 511 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम 66 (क), 66 (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसात आयएएस, आयपीएस व आयआरएस अधिका-यांच्या नावाने फसवणूकीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, बिहार, केरळ येथील अधिका-यांच्या नावाने अशा प्रोफाईल तयार करण्यात येत आहेत. अशा गुन्ह्यांत वाढ झाली असून दोन आयपीएस अधिका-यांनीही अशा प्रकारे तक्रार केल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. या अधिका-यांना समाजात मान असतो. आरोपी त्यांच्या संबंधीत काही खोटी माहिती प्रसारीत करून पैशांची मागणी करत आहेत. प्रतिष्ठीत व्यक्ती असल्यामुळे सामान्य नागरीकही अशा प्रकरणांमध्ये तात्काळ मदत करतात.

cases of creating fake facebook account and asking money from friends increased