esakal | मुंबईतील नियम अधिक कडक, No Mask! No Entry! मास्‍कशिवाय बेस्‍ट बस, टॅक्‍सी, रिक्षात प्रवेश नाही
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील नियम अधिक कडक, No Mask! No Entry! मास्‍कशिवाय बेस्‍ट बस, टॅक्‍सी, रिक्षात प्रवेश नाही

महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश ही दिले आहेत.

मुंबईतील नियम अधिक कडक, No Mask! No Entry! मास्‍कशिवाय बेस्‍ट बस, टॅक्‍सी, रिक्षात प्रवेश नाही

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : ता. 29 - ‘कोविड-19’ या संसर्गजन्‍य आजारावर नियंत्रण मिळविण्‍यासाठी महापालिकेद्वारे करण्‍यात येत असलेल्‍या विविधस्‍तरीय कार्यवाही अंतर्गत ‘विना मास्‍क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्‍मक कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांनी आज वरिष्‍ठ अधिका-यांच्‍या बैठकी दरम्‍यान दिले. याअंतर्गत महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश ही दिले आहेत. त्‍याचबरोबर सर्व बसेस, टॅक्‍सी, रिक्षा इत्‍यादींवर देखील याच आशयाचे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देश देण्‍यात आले असून, या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याचे निर्देशही महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत.

महत्त्वाची बातमी : 'तुम्ही खासदार आहात; बोलताना भान ठेवणं अपेक्षित आहे'; संजय राऊतांना न्यायालयाचा सल्ला

तोंड आणि नाक योग्‍यप्रकारे झाकले जाईल, अशाप्रकारे मास्कचा वापर करणे, हा ‘कोविड-19’ या संसर्गजन्‍य आजाराला प्रतिबंध करण्‍याचा सर्वांत प्रभावी उपाय असल्‍याचे आरोग्‍य व वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील तज्‍ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. महापालिका क्षेत्रात देखील नागरिकांद्वारे मास्‍कचा सुयोग्‍य व परिपूर्ण वापर व्‍हावा, यासाठ महापालिका सातत्‍याने जनजागृतीपर कार्यवाही करीत आहे. त्‍याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्‍क योग्‍यप्रकारे परिधान न करणाऱयांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये 200 यानुसार दंडात्‍मक कारवाईदेखील यापूर्वीच सुरु करण्‍यात आली आहे. ही कारवाई अधिक व्‍यापक व अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश ही आयुक्‍त चहल यांनी आज दिले आहेत. 

महत्त्वाची बातमी : भाजपवर निशाणा साधत अनिल देशमुख म्हणालेत; CBI ने आता सांगावं, सुशांतची हत्या होती की आत्महत्या

यानुसार आता लवकरच महापालिका क्षेत्रातील कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी निर्देश फलक बसविण्‍यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही तात्‍काळ सुरु करण्‍याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत. त्‍याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतील बसेस, रिक्षा, टॅक्‍सी इत्‍यादींवर देखील ‘मास्‍क नसल्‍यास प्रवेश मिळणार नाही’ अशा आशयाचा मजकूर असणारे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देश दिले आहेत. 

amid corona rules in mumbai are now more strict no mask no entry in buses and taxi