भाजपवर निशाणा साधत अनिल देशमुख म्हणालेत; CBI ने आता सांगावं, सुशांतची हत्या होती की आत्महत्या

सुमित बागुल
Tuesday, 29 September 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ज्या पद्धतीने CBI तपास करतंय, त्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ज्या पद्धतीने CBI तपास करतंय, त्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. CBI सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करतंय. हे सर्व प्रकरण मात्र बिहार निवडणूक लक्षात ठेऊन पुढे नेण्यात आलं, असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. आता CBI ने संपूर्ण महाराष्ट्राला हा मृत्यू की हत्या हे सांगावं असं आवाहन अनिल देशमुख म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : 'तुम्ही खासदार आहात; बोलताना भान ठेवणं अपेक्षित आहे'; संजय राऊतांना न्यायालयाचा सल्ला

काय म्हणालेत अनिल देशमुख : 
  
सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिस अत्यंत चांगल्या प्रकारे, प्रोफेशनली तपास करत होती. केंद्रशासनाने एकाएकी तपास CBI ला दिला. हा तपास CBI ला देताना सुप्रीम कोर्टानेही सांगितलं की, मुंबई पोलिस चांगल्या प्रकारे तपास करत आहेत. सुप्रीम कोर्टाने तसं आपल्या जजमेंटमध्ये उल्लेख केला होता. तसं असतानाही CBI कडे सुशांत सिंह राजपूत मृत्यूचा तपास गेला आणि गेला दीड महिना CBI याबाबत तपास करतेय. त्यामुळे आम्हाला देखील विचारायचं की सुशांत सिंहचा मर्डर आहे की आत्महत्या आहे. महाराष्ट्रातील जनातसुद्धा हाच प्रश्न विचारात होती. पण त्यामध्ये मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा राजकीय डाव काही पक्षांची आखला होता. अनेकांवर आरोप करण्यात आले. काहींना वाचवण्यासाठी मुंबई पोलिस संथ तपास करतंय असेहीआरोप झालेत. खरंतर मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने याचा तपास केला हे सुद्धा आपल्या सर्वांच्या लक्षात आलं आहे.

महत्त्वाची बातमी :  ऑक्टोबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरू होणार? आदित्य ठाकरे यांची महत्वपूर्ण माहिती

बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंह प्रकरणाचा राजकीय फायदा मिळवण्यासाठी, बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे प्रकरण पुढे नेण्यात आलं. बिहारच्या DIG यांचाही वापर राजकीय कारणासाठी करण्यात आला. या सर्वात कशापद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम काही राजकीय मंडळींनी केलं ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. ज्यांनी पाच वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं, पाच वर्ष ज्यांच्या हाताखाली मुंबई पोलिस काम करत होते, त्यांना सर्व वस्तुस्थिती माहिती होती. असं असताना त्यांची सुद्धा महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांचा वेगळ्या अर्थाने उल्लख केला. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं राजकारण करण्यात आलं हे महाराष्ट्रातील जनतेला आता कळून चुकलं आहे.  

अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील मत मांडलं आहे. 

home minister anil deshmukh targets bjp and CBI over sushant singh death case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home minister anil deshmukh targets bjp and CBI over sushant singh death case