सर्वात मोठी बातमी - मुंबईत पुढील १५ दिवस कडक संचारबंदी, मुंबई पोलिस म्हणतात...

सर्वात मोठी बातमी - मुंबईत पुढील १५ दिवस कडक संचारबंदी, मुंबई पोलिस म्हणतात...

मुंबई : - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतील कोरोना रुग्णाचा आकडा, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. एकीकडे MMR क्षेत्रातील ठाणे आणि नवी मुंबईत पुन्हा कडक लॉकडाऊन लागू  करण्यात आलाय त्याच पद्धतीने आता मुंबईकरांसाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबई पोलिसांकडून आलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रात्री ९ ते सकाळी ५ या काळात मुंबईकरांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. पुढील पंधरा दिवस म्हणजेच आज मध्यरात्रीपासून ते १५ जुलै मध्यरात्रीपर्यंत  ही संचारबंदी असणार आहे. दरम्यान या संचारबंडीच्या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. इतरांना आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरच्या परिघात बाहेर पडता येणार आहे.  

एकीकडे सरकारकडून मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा सुरु झालाय. मात्र सरकारकडून ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. या आधीच्या नियमांनुसारच हा ही लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. दरम्यान, नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबई आणि MMR भागात कोरोना रुग्णसंख्या वाढलेली पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मुबईकरांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. 

amid corona strict curfew in mumbai for next 15 days mumbai police shares info 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com