अत्यंत महत्त्वाची माहिती ! नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे थंडीचा काळ, थंडीत कोरोना पुन्हा वाढणार? तज्ज्ञ सांगतायत...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

नोव्हेबर डिसेंबर महिन्यात कोविडची लाट येण्याची शक्यता आहे. थंडीचाा  सिझन कोविड विषाणूच्या प्रसारासाठी पोषक असल्याने ही भिती वर्तवण्यात येत आहे

मुंबई : नोव्हेबर डिसेंबर महिन्यात कोविडची लाट येण्याची शक्यता आहे. थंडीचाा  सिझन कोविड विषाणूच्या प्रसारासाठी पोषक असल्याने ही भिती वर्तवण्यात येत आहे. काही विभागांमध्ये या काळात कोविड वाढीचा वेग वाढण्याचाा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कोविडचा विषाणू ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरतो. म्हणजे शिंकताना खोकताना उडणाऱ्या थुंकीतून हा आजार मोठ्याप्रमाणात पसरतो. हिवाळ्यातील वातावरण विषाणूजन्य आजारासाठी पोषक असते. त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये राज्यात कोविडची लाट येण्याची शक्यता आहे. या दोन महिन्यात मुंबईसह राज्याच्या तापमानात घट झालेली असते. त्यामुळे मुंबई आणि राज्यासाठी हे दोन महिने काळजीचे असतील.

बापरे! कोरोनाच्या औषधाबाबत मुंबईत घडला धक्कादायक प्रकार; तब्बल ५ दिवस..

भारतीय वैद्यकिय संशोधन परीषदेने केलेल्या सर्वेक्षणात देशात आजही या आजाराला बळी पडू शकतील अशा नागरीकांची संख्या मोठी आहे. तसेच थंडीच्या मोसमात ड्रॉपलेट आणि हवेतून पसरणारे आजार वाढतात. थंड वातावरण असे आजार पसरण्यासाठी पोषक असते. तसेच थंड मोसमात कोविड अधिक वाढल्याचे आतापर्यंत दिसून येत आहे. त्यामुळे थंडीत मुंबई, राज्यात हा आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे संसर्गजन्य आजाराचे राज्याचे तांत्रिक सल्लागार डॉ.सुभाष साळूंखे यांनी सांगितले.

सध्याच्या कोविड संक्रमणाच्या ट्रेंडनुसार हा आजार काही विशिष्ट पॉकेट्समध्ये वाढत आहे. मुंबईतील सात प्रभागात आजार वाढीचा वेग जास्त आहे. राज्यभरातही अशाच पध्दतीने कोविड संक्रमणाचा वेग आहे, असं तज्ज्ञ नमुद करतात. 

will corona increase in this winter season in mumbai and maharashtra see what experts are saying


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will corona increase in this winter season in mumbai and maharashtra see what experts are saying