मोठी बातमी! मुंबईच्या 'या' 3 रुग्णालयातील तब्बल 'इतक्या' कोरोना योद्धयांचा होणार सिरो-सर्व्हे.. 

health workers
health workers

मुंबई : जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्जस हॉस्पिटल आणि जीटी हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका व फ्रण्टलाइन कर्मचा-यांसाठी, सर्वांत मोठा कोविड19 सिरो-प्रिव्हेलन्स तपासणी करण्यात येणार आहे. 800 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असून देशातील हा पाहिला कोविड19 सर्व्हे ठरणार आहे. 

23 जून पासून या सिरो सर्व्हेला सुरुवात झाली आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटल व जीटी हॉस्पिटल या डेडिकेटेड कोविड रुग्णालयांसह जेजे रुग्णालयातील फ्रण्टलाइन कर्मचारी, परिचारिका व डॉक्टरांमधील कोविड-19 चा सिरो-प्रिव्हेलन्स तपासण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहेत. रोशेने विकसित केलेल्या सीएलआय- आधारित अँटिबॉडी चाचण्यांच्या मदतीने ही तपासणी केली जात आहे.

भारतातील फ्रण्टलाइन कर्मचा-यांमधील कोविड-19 चा सिरो-प्रिव्हेलन्स (रोगजनकांची पातळी) तपासण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अभ्यास झालेले नाहीत. फ्रण्टलाइन वर्कर्स, परिचारिका आणि डॉक्टर्स या आपल्या कोविड व बिगरकोविड रुग्णालयांमध्ये अविश्रांत काम करणा-या कोविड योद्ध्यांमधील सिरो-प्रिव्हेलन्सचे मापन करणारा हा पहिला पद्धतशीर अभ्यास आहे.

जेजे हॉस्पिटल व ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमधील डॉ. ए. बेलदार, डॉ. ए. मुथा आणि डॉ. एस देसाई यांनी आयबिटीस फाउंडेशन आणि निशांत कुमार यांच्या मदतीने सिरो-सर्व्हायलन्स (रोगजनकांची पाहणी) अभ्यास केला. आयसीएमआर तज्ज्ञ डॉ. एस पवार व डॉ. बी तांडेल तसेच कोविड कृती दलाचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांच्या सल्ल्याने या अभ्यासाची रचना करण्यात आली आहे.

कोविड-19 रुग्णांची काळजी घेण्याचे काम करणा-यांपैकी अनेकांचा विषाणूशी संपर्क येईल आणि ते सिरो-पॉझिटिव असतील, असे यूकेमध्ये गृहीत धरण्यात आले होते. यूकेतील हजारो डॉक्टर्स आणि फ्रण्टलाइन कर्मचा-यांमधील सिरो-पॉझिटिव असण्याचा दर तपासण्यासाठी यूकेत अनेक अभ्यास चालले आहेत. हॉटस्पॉट्स, फ्रण्टलाइन कार्यकर्ते, परिचारिका, डॉक्टर्स व अन्य अतिधोक्यातील घटकांमधील कोविड प्रादुर्भावच्या प्रमाणाचे मूल्यमापन करण्यासाठी सिरोलॉजिकल चाचण्यांचा वापर करण्याची शिफारस आयसीएमआरने नुकतीच केली आहे.

या अभ्यासाचा भाग म्हणून 200 डॉक्टर्स, 300 परिचारिका आणि 300 फ्रण्टलाइन कर्मऱ्यांची एक साधी रक्त चाचणी घेतली जाईल आणि रक्ताच्या नमुन्यांतील अँटिबॉडीजचे विश्लेषण केले जाईल.  या अभ्यासाची रचना अशी करण्यात आली आहे की, 50 टक्के चाचण्या बिगरकोविड जेजे रुग्णालयात होतील, तर 50 टक्के चाचण्या सेंट जॉर्जस व जीटी हॉस्पिटल या बिगरकोविड रुग्णालयांमध्ये होतील.

"कोविड आणि बिगरकोविड रुग्णालयांतील डॉक्टर्स, परिचारिका आणि फ्रण्टलाइन कर्मचा-यांमधील सिरो-प्रिव्हेलन्सचा अभ्यास करणारा हा सर्वांत मोठा अभ्यास आहे. अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यासोबत आमची आजाराबाबतची समज वाढणार आहे. भारताने या संशोधन पुढाकार घेणे महत्वाचे आहे", असे आयबिटीस फाउंडेशनचे संस्थापक डॉ.निशांत कुमार यांनी सांगितले आहे. 
sero survey on 800 health workers in mumbai  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com