आमिरच्या ‘वॉटर कप’चा दुसरा टप्पा घोषित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

मुंबई - आमिर खान आणि किरण राव यांच्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे झालेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे’ला चांगले यश मिळाले. त्यामुळे आता त्यांनी या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी म्युझिक व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

या स्पर्धेला पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या तीन तालुक्‍यांत एकूण एक हजार ३६८ कोटी इतका पाणीसाठा करण्याची क्षमता निर्माण झाली. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ३० तालुक्‍यांत पाणी फाऊंडेशन काम करणार आहे. याचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१७ आहे. विजेत्या तीन गावांना रोख बक्षिसे दिली जातील. पहिले बक्षीस ५० लाख, दुसरे ३० लाख; तर तिसरे २० लाखांचे असेल. प्रत्येक तालुक्‍यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावाला १० लाखांचे रोख बक्षीस दिले जाईल.
या स्पर्धेसाठी एक म्युझिक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. त्याला अजय-अतुलने संगीत दिले आहे. हे गीत गुरू ठाकूरने लिहिले आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी ३ जानेवारीला ‘सह्याद्री’ अतिथीगृहात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमिर खान, किरण राव, पाणी फाऊंडेशनचे मुख्याधिकारी सत्यजित भटकळ यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अन्य काही मान्यवर मंडळी उपस्थित राहतील. या वेळी म्युझिक व्हिडीओ दाखवण्यात येणार आहे.

Web Title: Amira's water cup second phase