Amit Chandole remanded in judicial custody till December 9 in Tops Group case
Amit Chandole remanded in judicial custody till December 9 in Tops Group case

टॉप्स ग्रुप प्रकरणी अमित चांदोळेला 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : टॉप्स ग्रुपप्रकरणी तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) अटक केलेले अमित चांदोळे यांना न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. चांदोळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. 

लंडन येथील मालमत्तांप्रकरणी ईडीने चांदोळे यांची 12 तास चौकशी केल्यानंतर 25 नोव्हेंबरला मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) कलम 3 व 4 अंतर्गत त्यांना अटक केली होती. याप्रकरणी रविवारी न्यायालयाने त्यांना 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. टॉप्स ग्रुपला मिळालेल्या एमएमआरडीएच्या कंत्राटात गैरव्यवहार करून त्यातील दरमहा सहा लाख रुपये त्यांना मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई व ठाण्यातील 10 ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यात चांदोळेच्या ठिकाणाचाही सहभाग होता. याप्रकरणी ईडीच्या रडारवर आलेल्या व्यावसायिक देवाण-घेवाणीबाबतची माहिती चांदोळेला असल्याचा संशय आहे. 

याप्रकरणी रमेश नायर यांच्या तक्रारीवरून यलो गेट पोलिस ठाण्यात टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 175 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरण नुकतेच तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे. त्यातही मॉरिशस येथील ट्रस्टबद्दल नायर यांनी आरोप केला होता. मनी लॉंडरिंग आरोपावरून ईडीने याप्रकरणी तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान, तक्रारीत करण्यात आलेले आरोप नंदा यांनी फेटाळून लावले होते. या वेळी 2009 मध्ये ईडीने लंडनमधील व्यवहाराबाबत आम्हाला यापूर्वी विचारणा केली होती. त्या वेळी कागदोपत्री पुराव्यांसह व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असल्याचे दाखवून दिले होते. तसेच मॉरिशस येथील ट्रस्टबाबतही यापूर्वी विचारण्यात आले होते. तो ट्रस्टही वकिलांच्या मदतीने पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने स्थापन करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते, असे नंदा यांनी स्पष्ट केले होते. 

---------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com