
नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतचा 10 किलोमीटरचा कोस्टल रोड सात महिने लांबणीवर पडला आहे. कोव्हिडचे लॉकडाऊन तसेच प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास झालेला विलंब यामुळे डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प आता जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंतचा कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे टोलमुक्त असेल.
मुंबई : नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतचा 10 किलोमीटरचा कोस्टल रोड सात महिने लांबणीवर पडला आहे. कोव्हिडचे लॉकडाऊन तसेच प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास झालेला विलंब यामुळे डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प आता जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंतचा कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे टोलमुक्त असेल.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट कोस्टल रोडचा आढावा घेतला. कोरोनाकाळातही कोस्टल रोडचे काम सुरू ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कामगार आणि पालिका अधिकाऱ्यांचे कौतुक केले. या वेळी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेही उपस्थित होते.
काम सुरू असलेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करण्यात आली असून, टनेल बोअरिंग मशीनची पाहणी केली. नरिमनपाईंटपासून समुद्रातून मलबार हिलच्या टेकडीखालून थेट प्रियदर्शनी पार्कपर्यंत बोगदा तयार करण्यात येणार आहे. हा बोगदा खोदण्याचे टनल बोअरिंग मशीन मुंबईत दाखल झाले आहे. या मशीनची बांधणी पूर्ण झाली आहे, तर 15 डिसेंबरपासून प्रत्यक्ष बोगदा खोदण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच हा संपूर्ण प्रकल्प जुलै 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे या वेळी सांगण्यात आले. कोस्टल रोडचे काम 2018 पासून सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्ष काही महिन्याच्या विलंबानंतर 2019 मध्ये काम सुरू झाले. यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च येणार असून, त्यातून वेळेची, इंधनाचीही बचत होणार आहे, असा दावा पालिकेकडून करण्यात आला.
कोरोनाकाळातही अडथळ्यांवर मात करून सर्व प्रकारची खबरदारी घेऊन कोस्टल रोडचे काम करणाऱ्या कामगार-अधिकारी, पालिकेला धन्यवाद देण्यासाठी आलो आहे. मुंबईला वेगवान बनवणारा कॉस्टल मुंबईसाठी फायदेशीर ठरणार आहे.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
--------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)