अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; काय बोलले अमित शाह ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

मुंबई, ता. 25 : नवीन सरकारची स्थापना ही दिवळीनंतरच होईल. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. 

मुंबई, ता. 25 : नवीन सरकारची स्थापना ही दिवळीनंतरच होईल. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. 

अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना आज सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत शिवसेनेचे जे उमेदवार निवडुन आले त्याबद्दल शुभेच्छा देत दिवाळी नंतर दोन्ही नेत्यांची नव्या सरकार स्थापने पुर्वी बैठक देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत नवीन सरकारच्या स्वरूपाबाबत निर्णय घेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

"महामुंबई" - सारे काही अपेक्षेनुसारच | Election Result Analysis 

निकालानंतर शिवसेना मुख्यमंत्री पादबाबत आक्रमक झाली आहे.कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी बोलतांना भाजपला 50/50 फॉर्म्युल्याची आठवण ही करून दिली. त्याचबरोबर त्यांच्या काही अडचणी असतील तर शिवसेना आता त्या समजून घेऊ शकणार नाही,मला माझा पक्ष चालवायचा आहे अश्या शब्दांत इशारा दिला आहे.

दिवाकर रावतेंना मातोश्रीवर 'नो एन्ट्री

यामुळे दिवाळी नंतर भाजपसोबत होणाऱ्या बैठकीत शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फॉर्म्युला ठरला? आदित्य ठाकरे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री....

WebTitle : amit shah called uddhav thackeray what did shah said vidhan sabha election 2019


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah called uddhav thackeray what did shah said vidhan sabha election 2019