

Uniform Civil Code UCC To Be Implemented In Three Years Amit Shah Sets Deadline For NDA Ruled States
sakal
मुंबई : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार असणाऱ्या २१ राज्यांमध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मोदी यांच्या गुजरात व केंद्रातील २५ वर्षांच्या सत्तेच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. याविषयी अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेत माहिती दिली.