चाणक्य कोण? यावर अमित शाह स्वतः म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

दिल्लीच्या निकालानंतर भाजपवर चहुबाजूने विरोधक राजकीय टीका करतायत. स्वतः अमित शाह यांना देखील दिल्लीतील पराभव जिव्हारी लागलाय. 'गोली मारो' च्या विधानामुळे आमचं नुकसान झाल्याचं अमित शाह यांनी कबुल केलं.

एका मुलाखतीत अमित शाह यांना विचारण्यात आलं, "राजकारणातील चाणक्य तुम्हाला म्हंटल जातं, मात्र खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार? असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं उत्तर फारच चर्चेत आहे. 

मोठी बातमी -  नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा...

मी चाणक्यनीती अनेकदा वाचली आहे. मी कायम चाणक्यनीती समजून घेण्याचा प्रयत्न देखील करतो. मात्र भगवान कौटिल्य म्हणजेच 'चाणक्य' यांच्याशी तुलना करण्याचा मी विचारही करू शकत नाही. शरद पवारांवर बोलायचं झालं तर, शरद पवार एक दिग्गज नेते आहेत. मागील अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवारांनी अनेक सरकारं बनवली आणि पाडली देखील. असं अमित शाह म्हणालेत. दिल्लीतील भाजपच्या पराभवानंतर अमित शाह यांच्या 'चाणक्य'नीतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

मोठी बातमी - इथे आहे, सूर्याजी मालुसरे यांचे समाधिस्थळ...पाहा कसे आहे....

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्यात. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये ब्रेकअप झाल्याने महाराष्ट्रात भाजपाला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची हातमिळवणी आणि सत्ता स्थापनेत शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. खरंतर तेंव्हापासूनच 'अमित शहा' चाणक्य की 'शरद पवार' चाणक्य असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशात महाराष्ट्रमागोमाग दिल्लीतही भाजपाला आप ने दिलेली टक्कर आणि भाजपाची झालेली हार यामुळे अमित शाह यांची जादू कमी पडतेय का? असा सवाल आता विचारला जातोय. अशातच अमित शहा यांनी 'चाणक्य' कोण या प्रश्नावर दिलेलं उत्तर सोशल मीडियात व्हायरल होतंय. 

amit shah or sharad pawar who is chanakya of politics amit shaha says 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah or sharad pawar who is chanakya of politics amit shaha says