Amit Shah statement : ''महाराष्ट्रात भाजप कोणत्याही कुबड्यांच्या आधारावर नाही'' ; अमित शहांचं वक्तव्य अन् राजकीय चर्चांना उधाण!

Amit Shah statement about Maharashtra BJP : भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले आहे.
Amit Shah

Amit Shah

esakal

Updated on

Amit Shah’s Major Statement on Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज(सोमवार) महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यलायाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले. याप्रसंगी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी निवडणुका ताकदीने लढण्याचे आवाहन केले. शिवाय, यावेळी त्यांनी महाराष्ट्रात भाजप कोणत्याही कुबड्यांच्या आधारावर उभी नाही तर आपल्या ताकदीवर उभी असल्याचे सांगितले. अमित शहांच्या या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अमित शहा म्हणाले, ''आज सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी विशेष करून महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी शुभ दिवस आहे. कारण, आज महाराष्ट्र प्रदेश भाजप आपल्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करून एक नवीन सुरुवात करत आहे. जेव्हापासून आपल्या पार्टीची स्थापना झाली तेव्हापासून १९५० पासून ते २०२५ पर्यंत प्रत्येक छोट्यामोठ्या कार्यकर्त्याला घेऊन, मोठ्या नेत्यांपर्यंत आपल्याला सर्वांना माहीत आहे की, भाजप कार्यालय आपल्या सर्वांसाठी मंदिर असते.''

याचबरोबर, महाराष्ट्रात भाजप कोणत्याही कुबड्यांच्या आधारावर नाही चालत, तर आपल्या ताकदीवर उभी आहे. भारतीय राजकारणात ज्याप्रकारे भाजपचे अस्तित्व, भाजपचे सिद्धांत एक वेगळे स्थान राखते, तशाचप्रकारे आता महाराष्ट्रातही भाजप महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे एक मजबूत हस्ताक्षर आहे यात कोणतीही शंका नाही. असंही यावेळी अमित शहा यांनी बोलून दाखवलं.

Amit Shah
Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

याचबरोबर, ''देशाची जनता भाजपच्या स्वागतासाठी तयार आहे. याच महाराष्ट्रात आपण २०१४ मध्ये चौथ्या क्रमांकाचा पक्ष होतो, परंतु आज आपण पहिल्या नंबरचा पक्ष आहोत. तसेच, आगामी निवडणडणुकाही प्रचंड ताकदीने लढा. मी केवळ डबल इंजिन सरकारवर समाधानी नाही, मला ट्रिपल इंजन सरकार हवे आहे. असंही यावेळी अमित शहा यांनी बोलून दाखवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com