...आणि म्हणूनच पत्राद्वारे 'राज'पुत्रानं महाराष्ट्राच्या जनतेला केलं 'हे' आवाहन

...आणि म्हणूनच पत्राद्वारे 'राज'पुत्रानं महाराष्ट्राच्या जनतेला केलं 'हे' आवाहन
Updated on

मुंबई :  सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाचा निसर्ग वादळाचं संकट मुंबईसह कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. निसर्ग वादळ मुंबईच्या आणखी जवळ आलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी 11.30 च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला एक आवाहन केलं आहे. अमित ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअरही केलं आहे. 

अमित ठाकरेंनी काय म्हटलं पत्रात 

प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो,

करोना संकटावर मात करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत असतानाच आणखी एक नवं संकट आपल्यासमोर येऊन उभं राहिलंय. हे संकट आहे, चक्रीवादळाचं.

या चक्रीवादळाच्या अतिवेगवान वाऱ्यामुळे गरीब आणि बेघर लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. फक्त माणसांनाच नव्हे तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, रस्त्यावरच्या प्राण्यांना तुमच्या इमारतीच्या आवारात आश्रय घेऊ द्या, त्यामुळे ते सुरक्षित राहतील. मला पूर्ण कल्पना आहे की, अनोळखी लोकांना इमारतीत घेणं आपल्यापैकी अनेकांना शक्य होणार नाही. पण एकदा का हे चक्रीवादळाचं संकट निघून गेलं की, आपण सर्वांनी घराबाहेर पडून गरजूंना मदत करायला हवी. कुणाला जेवण, तर कुणाला औषधं उपलब्ध करुन द्यायला हवी.

एक जबाबदार नागरिक म्हणून या संकटकाळात आपल्याला जे काही मदतकार्य करणं शक्य असेल ते आपण करायला हवं.

मला विश्वास आहे की, आपला एक लहानसा प्रयत्नही एखाद्याच्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतो.

आपण आपल्याला जमेल तितकी मदत करावी असं आवाहन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला केलं आहे. फक्त माणसांविषयीच नाही तर भटक्या प्राण्यांविषयचीही माणुसकी सोडू नका असंही आवाहन अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात राज्याच्या जनतेला केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com