अमित ठाकरे करणार उद्या महाआरती; राज्यभर साजरी करणार अक्षय्य तृतीया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Thackeray

अमित ठाकरे करणार उद्या महाआरती; राज्यभर साजरी करणार अक्षय्य तृतीया

मुंबई : काल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद येथे सभा घेतली आहे. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनी उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईतील प्रभादेवी मंदिरात महाआरती करणार आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर महाआरती करणार असून त्यासंबंधित आदेश पक्षांच्या कार्यतर्त्यांना दिले आहेत. तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे मुंबईतील प्रभादेवी मंदिरात महाआरती करणार आहेत.

हेही वाचा: "बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती हे..."; राऊतांचा भाजपावर पलटवार

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भोंग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. जर ३ तारखेनंतर भोंगे खाली उतरवले नाही तर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवणार आहोत असा इशारा त्यांनी परत दिला आहे. तसेच उद्या इस्लाम धर्मियांचा ईदचा सण आहे. त्याच मुहूर्तावर मनसेकडून राज्यभर महाआरती करण्यात येणार आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी उद्याच्या महाआरतीसंदर्भातील आदेश पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिले असल्याची माहिती आहे. उद्या ईद असल्यामुळे महाआरती करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी मागण्यात येत आहेत. महाआरतीच्या दरम्यान धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची तारांबळ उडणार आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी 3 दिवस युरोप दौऱ्यावर; जर्मनीच्या चान्सरलसोबत आज चर्चा

औरंगाबाद येथील सांस्कृतीक मंडळाच्या मैदानात काल राज ठाकरे यांनी सभा घेत पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे. ईदच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही भोंग्याचा आवाज ऐकणार नाहीत असा इशारा देत त्यांनी हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सभा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेणार आहे असंही त्यांनी जाहीर सभेवेळी सांगितलं आहे.

Web Title: Amit Thackeray Mahaarati Prabhadevi Mandir Mumbai Akshayy Trutiya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top