अमिताभच्या संपत्तीवर अभिषेक, श्वेताचा समान हक्क

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

मुलामुलीत भेदभाव करणाऱ्या लोकांसाठी अमिताभने ही चांगली शिकवण दिली आहे. या आठवड्यात महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच अमिताभ यांनी संपत्ती वाटपामध्ये मुलामुलीत समानता केली आहे.

नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत माझ्या मृत्यूनंतर संपत्तीमध्ये मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांचा समान हक्क असेल, असे म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांनी हातात फलक घेतलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फलकावर त्यांनी लिहिले आहे, की माझा मृत्यू जेव्हा होईल, त्यानंतर माझ्या सर्व संपत्तीवर माझा मुलगा आणि मुलीचा समान हक्क असेल. त्यानंतर अमिताभ यांनी  #genderequality #WeAreEqual असल्याचेही स्पष्ट केले आहे.

मुलामुलीत भेदभाव करणाऱ्या लोकांसाठी अमिताभने ही चांगली शिकवण दिली आहे. या आठवड्यात महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच अमिताभ यांनी संपत्ती वाटपामध्ये मुलामुलीत समानता केली आहे. अमिताभ यांनी यापूर्वीही श्वेताचे कौतुक केलेले आहे. तसेच त्यांनी आपल्या नातींना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

Web Title: Amitabh Bachchan to divide assets EQUALLY between son Abhishek and daughter Shweta