esakal | अमिताभ बच्चन व्हीकेसीचे ब्रँड ॲम्बेसेडर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

अमिताभ बच्चन व्हीकेसीचे ब्रँड ॲम्बेसेडर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : व्हीकेसी (VKC) या पादत्राणे तयार करणाऱ्या ब्रँडशी संलग्न होऊन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी व्हीकेसीचे ब्रँड ॲम्बेसेडर होण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हीकेसी भारतीयांना परवडणारे फूटवेअर उपलब्ध करून देणारी अग्रगण्य कंपनी आहे. व्हीकेसीने नुकतेच सुपरसॉफ्ट फूटवेअरचे कलेक्शन लॉन्च केले आहे. व्हीकेसीचे ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, व्हीकेसीसोबत संलग्न होण्याचा मला अभिमान आहे. सर्व भारतीयांना प्रेरित करून भारताला जगात सर्वोच्च स्थान प्राप्त करण्यासाठी आम्ही एकत्रित परिश्रम करू.

हेही वाचा: भारतीयांना तालिबान्यांचे संरक्षण

ते म्हणाले की, मला आनंद वाटतो की व्हीकेसीसोबत माझ्या कारकिर्दीत प्रथम मी एका फूटवेअर ब्रँडला एंडॉर्स करीत आहे.

loading image
go to top